'चैम्पियन व्हा!' हे डॉ.रमा मराठे यांचे पुस्तक वाचले.विष्णुशर्मा यांचे पञ्च तंत्र तसे त्यांनी १.अभ्यास २. आरोग्य ३.आत्मविकास ४. संस्कार ५. सामाजिक बांधिलकी या पाच सुत्रांचा पाया खूप गोष्टी आणि उदाहरणे देऊन भक्कम कसा करावा ते सांगितले आहे.
सध्याच्या competition च्या जगात हल्ली विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढ़ल्याच्या बातम्या पेपरात रोज वाचायला मिळतात.त्या backgroundvar प्रत्येक मुलाने आणि त्याच्या पालकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.
'education is the capacity to solve the problems in life' हे वाक्य म्हणजे शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण बदलण्यासाठी सांगितलेला एक मंत्रच आहे. मुलांना केवळ मार्कार्थी बनवून रेसला लावलेल्या घोडयाप्रमाणे धावडवायचा चंग ज्या पालकानी बांधला आहे त्यानी हा मंत्र पाठच करायला पाहिजे.
आत्मविकास करण्यासाठी स्वत्तःची कोणाशीही तुलना न करण्याचे पथ्य पाळले पाहिजे।प्रत्येक individual हा वेगळा असतो तेंव्हा कोणाची कोणाशीही तुलना करू नका।तुलना स्वतः शी करा मग improvement होइल
गणपति आणि कर्तिकेयाची पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट सांगुन गणपतीसारखे smart व्हा असा सल्ला त्यानी दिलाय.
शारीरिक सुन्दरतेपेक्षा विचार आणि आचार यांचे सौंदर्य जास्ती श्रेष्ठ ठरते हे पटवण्यासाठीही त्यानी उदाहरणे दिली आहेत.
'आवडीचे काम करणे' आणि 'काम आवडीने करणे' यातला फरक लक्षात घ्या.
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही ग़ळे-जिद्द असेल तर काहीच अशक्य नहीं हे सांगताना wilma rudolf हिचे उदहारण दिले आहे.वयाच्या नवव्या वर्षी पायाने पांगली झालेली मुलगी केवल तिच्या जिद्दिमुले १९६० च्या Olymoic चे धावण्याचे gold medal मिळवू शकली.
शरीर आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू ...एकमेकांवर अवलंबून ...अगदी अंतर्बाह्य। शरीर हे बाह्य रूप तर मन हे अन्तरंग। मन प्रसन्न असेल तर शरीराला उत्साह वाटतो आणि मनाला आलेली मरगळ शरीराला थकलेले दाखवते.
मनाच्या स्वास्थ्यासाठी मेडिटेशन आणि वैचारिक शांती तर शारीरिक स्वस्थतेसाठी चांगला आहार पाहिजे.
नुसती बुद्धिमत्ता असून पुरेसे नाही तर शारीरिक शक्तीही तितकीच महत्त्वाची आहे.म्हणुनच अभ्यास बरोबरच व्यायामालाही priority द्यायला पाहिजे हे त्यानी आवर्जून सांगितले.
सूर्य वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो.निसर्ग त्याचे काम वेळेवर करत असतो.त्यांचे काम शिस्तीत चालते मग आपण का शिस्त लावून घेत नाही? आपणही जर चांगल्या सवयी लावून घेतल्या तर त्यांची अड़चण न होता आपल्या अंगचे गुण होतात.वेळेवर उठ्णे,वेळेवर झोपणे,वस्तू जागेवर ठेवणे आणि कितीतरी गोष्टी आहेत की त्यामुळे आपले life easy होते।
नकारात्मक विचार काढून positive विचार कसे करावेत आणि त्याबाबत self instructions कशा द्याव्यात हेही त्यानी चांगल्या प्रकारे सांगितले आहे।
self confidence आणि over confidence यातली fine line क्ळणे गरजेचे आहे.
problem कड़े बघण्याचा आपला द्दृष्टीकोनच जर बदलला तर तो problem हा problem राहतच नाही.यासाठी त्यानी Goliethchi गोष्ट सांगितली आहे.
संस्कृत आणि मराठी सुभाषितांच्या आधारे कितीतरी प्रश्न सोडवून दाखवले आहेत.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे।
आळस हा माणसाचा प्रथम शत्रू आहे
अभ्यासासाठी planning हे अत्यावश्यक आहे
अशा अनेक युक्त्या आणि कल्पना गोष्टिरुपाने मांडल्या आहेत।
पुस्तक खर्च वाचण्यासारखे आहे.
Saturday, January 2, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment