Thursday, January 21, 2010

a book about our health

'Don't lose your mind ,lose your weight' हे पुस्तक वजन कमी करण्यासाठीचे नसून खाण्यापिण्याच्या योग्य habits बद्दल आहे. रुजुताने सांगितलेल्या बऱ्याच habits आपल्याला ओळखीच्या वाटतात.आपण त्या पाळतोही.
उदा.जेवायच्या आधी हात धुणे.
जेवताना चावून जेवणे.
पण काही सवयी आपण या modernisation मध्ये विसरून चाललो आहोत.त्या म्हणजे
जेवताना मांडी घालून बसणे,
जेवण्याच्या आधी 'वदनी कवळ घेता...सारखा श्लोक म्हणणे.
जेवताना फ़क्त जेवण्याचे काम करणे.( टीवी न बघणे,पेपर न वाचणे, फोनवर न बोलणे,comp वर न बसणे इ. इ. )

कदाचित globalisation मुळेत्याना follow करणे शक्यही होंत नसेल पण कालानुरूप त्यात थोड़े बदल करुन जे आपल्या lifestyle ला योग्यआहेत ते स्वीकारून जर आपण जर वागलो तर या वाढत्या तणावाला आपण समर्थपणे तोंद देऊ शकू.

मनःस्वास्थ्यासाठी मेडिटेशन आज जगाने मान्य केले आहे. दिवसातला थोडा वेळ आपण त्यासाठी काढला तरत्याचे फायदे नक्कीच अनुभवायला मिळतात.
शारीरिक स्वास्थ्यासाठी काही गोष्टी आवर्जून कराव्यात ज्या सहज शक्य आहेत.
उदा. सकाळी उठून रिकाम्या पोटावर चहासारखे पेय न घेता एखादे फळ खावे.
तासाभरात न्याहारी/ नाश्ता आणि तेंव्हा चहा घ्यावा.
दर दोन ते अडीच तासाने आपल्या शरीराच्या गरजेनुसार खावं.
दिवसभरात प्रमाणात पाणी प्यावे.
पोट खूप वेळ रिकामे ठेवू नए .
रात्रीचे उशिरा खूप जड़ जेवू नए .

जेवताना त्या अन्नाचा मान ठेवणे जरुरीचे आहे. ज्या अन्नामुळे आपण जगतो, जे अन्न आपल्याला उर्जा देतेत्याला न्याय देणे हे आपले कर्त्तव्य आहे। म्हणुनच हात जोडून जेवायच्या आधी श्लोक म्हणण्याची प्रथा आहे

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी हे अन्न मी सेवणार
घडो माझिया हातुनी देशसेवा
म्हणोनी मिळावी मला शक्ति देवा


या चांगल्या सवयी आहेत त्या एकदा लागल्या की जाणार नाहीत आणि आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होइल.

खाण्याबरोबराच व्यायामाचिही आवश्यकता आहे हेही तिने पटवून दिलेले आहे. एखादी नवीकोरी गाड़ी धुवून पुसून स्वच्छ ठेवली पण चालवलीच नाही तर तिचा काहीही उपयोग नाही.पण एखादी जुनी गाड़ी जी नेहेमी चालवली जाते ती नक्कीच उपयोगाची आहे .नाही का?

her four principles are

1.never wake up to tea or coffee
2.eat every 2 hours
3.eat more when you are more active and less when you are less active
4.finish your last meal at least 2 hours prior to sleeping

लवकर नीजे लवकर उठे त्यास ञान,संपत्ति आरोग्य भेटे हे तत्त्व तिने पुन्हा एकदा सांगितले आहे। हे पुस्तक वाचताना प्रत्येक व्यक्ति ही वेगळी आहे आणि म्हणुनच तिचे diet पण वेगळे असणार. plan ठरवताना common sense जागा ठेवून आपल्या गरजेनुसार plan करणे योग्य ठरेल असे तिचे म्हणणे आहे.खाण्यापिण्याच्या कोणत्याही पद्धतीमध्ये 'moderation is the key word' असे तिचे सांगणे आहे.

Thursday, January 14, 2010

बिकट वाट वहिवाट नसावी...

कवी अनंत फंदी यांचा एक फटका मला आठवला... किती सोप्या शब्दात आणि सरळ भाषेत माणसाने जीवनात काय करावे आणि काय टाळावे हे सांगितलेले आहे।


बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐस आपला, उगाच भटकत फिरुं नको
चल
सालसपण धरुनि निखालस, खोट्या बोला बोलुं नको
अंगि नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको
नास्तिकपणिं तुं शिरुनि जनाचा बोल आपण घेउ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढतीं पाहुं नको
मायबापांवर रुसूं नकोदुर्मुखलेला असूं नको
व्यवहारामंधी
फसूं नको
कधीं रिकामा बसूं नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करुं नको ॥१॥

वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसयाचा ठेवा, करुनी हेवा, झटूं नको
मी मोठा शाहणा, धनाढ्यही , गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनि चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गोरगरीबांना तूं गुरकावु नको
दो दिवसांची जाइल सत्ता, अपेश माथा घेउ नको
विडा पैजेचा उचलुं नको
उणी कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहुं नको ॥२॥

उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करुं नको
वरी खुशामत शाहण्याची परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजीभाकरी, तूपसाखरे चोरुं नको
दिली स्थिती देवाने तींतच मानी सुख, कधिं विटूं नको
असल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटूं नको
आतां तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकुं नको
सुविचारा कातरुं नको
सत्संगत अंतरुं नको
द्वैताला अनुसरुं नको
हरिभजना विस्मरुं नको
सत्कीर्ती नौबतिचा डंका गाजे मग शंकाच नको ॥३॥

म्हणी अनुभवाच्या खाणी

माणूस अनुभवातून शहाणा होत जातो असे म्हणतात । अनुभवच आपल्याला शिकवत असतो । आपण घडत असतो ते अनुभवाच्या शाळेत। 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा ' या म्हणीतून हेच लक्षात येते।
'अति तिथे माती ' ही म्हण देखील सिद्ध झालेली आहे । काळ कितीही बदलला तरी त्या म्हणीचे महत्त्व कमी झालेले नाही. या सनार्ब्हत मला एक कविता आठवते ....प्रमाण नावाची कृष्णाजी आठल्ये यांची

जीवनात प्रमाणाला किती महत्व आहे ते या कवितेतून कळते। जसे जेवणात मिठाचे प्रमाण चुकले की जेवणाची गोडी जाते अगदी तसेच जीवनाचे होते । आपल्या वागण्यात , बोलण्यात , आचारात आणि विचारात देखिल प्रमाणात असणे सुखावह ठरते.

अतीकोपता कार्य जाते लयाला, अती नम्रता पात्र होते भयाला ।
अती काम ते कोणतेही नसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १ ।।

अती लोभ आणी जना नित्य लाज, अती त्याग तो रोकडा मृत्य आज ।
सदा तृप्त नेमस्त सर्वां दिसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २ ।।

अती मोह हा दु:ख शोकास मूळ, अती काळजी टाकणे हेही खूळ ।
सदा चित्त हे सद्विचारे कसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ३ ।।

अती ज्ञान अभ्यासल्या क्षीण काया, अती खेळणे हा भिकेचाच पाया ।
न कष्टाविणे त्वा रिकामे बसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ४ ।।

अती दान तेही प्रपंचात छिद्र, अती हीन कार्पण्य मोठे दरिद्र ।
बरे कोणते ते मनाला पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ५ ।।

अती भोजने रोग येतो घराला, उपासे अती कष्ट होती नराला ।
फुका सांग देवावरी का स्र्सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ६ ।।

अती स्नेह तेथे अवज्ञा उदंड, अती द्वेष भूलोकीचे पंककुंड ।
अती मत्सरे त्वां कशाला कुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ७ ।।

अती आळशी वाचुनी प्रेतस्र्प, अती झोप घे तोही त्याचाच भूप ।
सदा सत्कृतीमाजी आत्मा विसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ८ ।।

अती द्रव्यही जोडते पापरास, अती घोर दारिद्य्र तो पंकवास ।
धने वैभवे त्वां न केंव्हा फसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ९ ।।

अती भाषणे वीटती बुद्धिवंत, अती मौन मूर्खत्व ते मूर्तिमंत ।
खरे तत्त्व ते अल्पशब्दे ठसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १० ।।

अती वाद घेता दुरावेल सत्य, अती `होस हो' बोलणे नीचकृत्य ।
विचारे तुवा ज्ञानमार्गी घुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। ११ ।।

अती औषधे वाढवितात रोग, उपेक्षा अती आणते सर्व भोग ।
हिताच्या उपायास कां आळसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १२ ।।

अती दाट वस्तीत नाना उपाधी, अती शून्य रानात औदास्य बाधी ।
लघुग्राम पाहून तेथे वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १३ ।।

अती शोक तो देतसे दु:खवृद्धी, अती मानतो हर्ष तो क्षूद्रबुद्धी ।
ललाटाक्षरां सांग कोणी पुसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १४ ।।

अती भूषणे मार्ग तो संकटाचा, अती थाट तो वेष होतो नटाचा ।
रहावे असे की न कोणी हसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १५ ।।

स्तुतीला अती बोलती श्वानवृत्ती, अती लोकनिंदा करी दुष्ट चित्ती ।
न कोणा उगे शब्द स्पर्शे डसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१६ ।।

अती भांडणे नाश तो यादवांचा, हठाने अती वंश ना कौरवांचा ।
कराया अती हे न कोणी वसावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १७ ।।

अती गोड खाणे नसे रोज इष्ट, कदन्ने अती सेवणे हे कनिष्ठ ।
असोनी गहू व्यर्थ खावे न सावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। १८ ।।

जुन्याचे अती भक्त ते हट्टवादी, नव्याचे अती लाडके शुद्ध नादी ।
खरे सार शोधोनिया नित्य घ्यावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।।१९ ।।

सदा पद्य घोकोनियां शीण येतो, सदा गद्य वाचोनियां त्रास होतो ।
कधी ते कधी हेही वाचीत जावे, प्रमाणामधे सर्व काही असावे ।। २० ।।

किती मार्मिक कविता आहे ही । प्रत्येक गोष्टीला सुवर्णमध्य असला पाहिजे हे जाणवते ही कविता वाचल्यावर।

आणखी काही म्हणीं विषयी पुढच्या भागात....

Saturday, January 2, 2010

पंचसूत्र

'चैम्पियन व्हा!' हे डॉ.रमा मराठे यांचे पुस्तक वाचले.विष्णुशर्मा यांचे पञ्च तंत्र तसे त्यांनी १.अभ्यास २. आरोग्य ३.आत्मविकास ४. संस्कार ५. सामाजिक बांधिलकी या पाच सुत्रांचा पाया खूप गोष्टी आणि उदाहरणे देऊन भक्कम कसा करावा ते सांगितले आहे.

सध्याच्या competition च्या जगात हल्ली विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटना वाढ़ल्याच्या बातम्या पेपरात रोज वाचायला मिळतात.त्या backgroundvar प्रत्येक मुलाने आणि त्याच्या पालकाने वाचावे असे हे पुस्तक आहे.

'education is the capacity to solve the problems in life' हे वाक्य म्हणजे शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोण बदलण्यासाठी सांगितलेला एक मंत्रच आहे. मुलांना केवळ मार्कार्थी बनवून रेसला लावलेल्या घोडयाप्रमाणे धावडवायचा चंग ज्या पालकानी बांधला आहे त्यानी हा मंत्र पाठच करायला पाहिजे.

आत्मविकास करण्यासाठी स्वत्तःची कोणाशीही तुलना न करण्याचे पथ्य पाळले पाहिजे।
प्रत्येक individual हा वेगळा असतो तेंव्हा कोणाची कोणाशीही तुलना करू नका।तुलना स्वतः शी करा मग improvement होइल

गणपति आणि कर्तिकेयाची पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट सांगुन गणपतीसारखे smart व्हा असा सल्ला त्यानी दिलाय.

शारीरिक सुन्दरतेपेक्षा विचार आणि आचार यांचे सौंदर्य जास्ती श्रेष्ठ ठरते हे पटवण्यासाठीही त्यानी उदाहरणे दिली आहेत.

'आवडीचे काम करणे' आणि 'काम आवडीने करणे' यातला फरक लक्षात घ्या.


प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही ग़ळे-जिद्द असेल तर काहीच अशक्य नहीं हे सांगताना wilma rudolf हिचे उदहारण दिले आहे.वयाच्या नवव्या वर्षी पायाने पांगली झालेली मुलगी केवल तिच्या जिद्दिमुले १९६० च्या Olymoic चे धावण्याचे gold medal मिळवू शकली.

शरीर
आणि मन एकाच नाण्याच्या दोन बाजू ...एकमेकांवर अवलंबून ...अगदी अंतर्बाह्य। शरीर हे बाह्य रूप तर मन हे अन्तरंग। मन प्रसन्न असेल तर शरीराला उत्साह वाटतो आणि मनाला आलेली मरगळ शरीराला थकलेले दाखवते.
मनाच्या स्वास्थ्यासाठी मेडिटेशन आणि वैचारिक शांती तर शारीरिक स्वस्थतेसाठी चांगला आहार पाहिजे.
नुसती बुद्धिमत्ता असून पुरेसे नाही तर शारीरिक शक्तीही तितकीच महत्त्वाची आहे.म्हणुनच अभ्यास बरोबरच व्यायामालाही priority द्यायला पाहिजे हे त्यानी आवर्जून सांगितले.

सूर्य वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो.निसर्ग त्याचे काम वेळेवर करत असतो.त्यांचे काम शिस्तीत चालते मग आपण का शिस्त लावून घेत नाही? आपणही जर चांगल्या सवयी लावून घेतल्या तर त्यांची अड़चण न होता आपल्या अंगचे गुण होतात.वेळेवर उठ्णे,वेळेवर झोपणे,वस्तू जागेवर ठेवणे आणि कितीतरी गोष्टी आहेत की त्यामुळे आपले life easy होते।

नकारात्मक विचार काढून positive विचार कसे करावेत आणि त्याबाबत self instructions कशा द्याव्यात हेही त्यानी चांगल्या प्रकारे सांगितले आहे।

self confidence आणि over confidence यातली fine line क्ळणे गरजेचे आहे.

problem कड़े बघण्याचा आपला द्दृष्टीकोनच जर बदलला तर तो problem हा problem राहतच नाही.यासाठी त्यानी Goliethchi गोष्ट सांगितली आहे.

संस्कृत आणि मराठी सुभाषितांच्या आधारे कितीतरी प्रश्न सोडवून दाखवले आहेत.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे।
आळस हा माणसाचा प्रथम शत्रू आहे
अभ्यासासाठी planning हे अत्यावश्यक आहे
अशा अनेक युक्त्या आणि कल्पना गोष्टिरुपाने मांडल्या आहेत।
पुस्तक खर्च वाचण्यासारखे आहे.

Friday, January 1, 2010

नवीन वर्षाचे स्वागत.........०१.०१.२०१०

२०१०....१ जानेवारी....नववर्षाचा पहिला दिवस नेहेमीच आनंद, उत्साह आणि जोश घेउन येतो। नवे संकल्प, नवे विचार आणि नव्या आशा पल्लवीत होतात.
गतवर्षाच्या चुका, वाईट आठवणी, या सर्वाना तिलांजलि देत नविन वर्षाची नवीन सुरुवात करण्याची उर्मी मनात निर्माण होते।
याच आशेने २०१०चे मी स्वागत करते